पंतप्रधानांची सूचना – चक्रीवादळाशी लढण्याबाबत उपाययोजनांचा आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या दोन-तीन दिवसात पूर्व किनारपट्टीला ‘यास’ चक्रीवादळ धडकण्याची शक्मयता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱयांशी चर्चा केली. या बैठकीत चक्रीवादळाशी लढण्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच समुद्रकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देतानाच आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना या वादळाचा फटका बसण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर नुकतेच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर आठवडाभरातच पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळ धडकणार आहे. ‘तौक्ते’मुळे बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱया यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवे चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. ‘यास’ चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱया संभाव्य परिस्थितीसाठी ‘एनडीआरएफ’च्या तुकडय़ा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आढावा बैठकीत वरि÷ प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील प्रतिनिधी, दूरसंचार, वीज, नागरी उड्डाण मंत्रालयातील सचिवांची उपस्थिती होती. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही सहभागी झाले होते.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 26 मे रोजी यास चक्रीवादळ पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्मयता आहे. केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल आणि ओडिशासोबतच आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबारमधील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून किनारी भागामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, यास चक्रीवादळाच्या मार्गात येणाऱया प्रदेशामध्ये असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्व किनारपट्टीवरील राज्ये सतर्क
भारतीय हवामान खात्याने 26 मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्मयता वर्तवली आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाची संभाव्यता, मार्ग, तिचा वेग, किनारपट्टीवर धडकणार असलेलं ठिकाण इत्यादींची माहिती अद्याप दिली नसली तरी सरकारने तयारी सुरू केली आहे. इशाऱयानंतर ओडिशा सरकारने 14 जिल्हय़ांना सतर्क केले आहे. भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच मच्छिमारांना त्वरित समुद्रातून परतण्याचा सल्ला दिला असून लोकांना किनाऱयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.









