सत्यभामा ही सत्राजिताची अत्यंत सुंदर, गुणी कन्या. तिला अनेकांनी लग्नाची मागणीही घातली होती. सत्राजित योग्य वराच्या शोधात होता. आता आपल्या पापाच्या क्षालनार्थ आपली ही लाडकी कन्या कृष्णाला अर्पण करावी आणि कन्यादानाचे वेळी आंदण म्हणून स्यमंतकमणी देखील कृष्णाला अर्पण करावा असा विचार सत्राजिताने आपल्या पत्नीपाशी व्यक्त केला.
कामिनी म्हणे उत्तमोत्तम । समीचीन हा उपाय परम। तया दोषाचें लांछनतम । याविण शम हो न शके । यावीण आन उपायकोटि। करितां कृतागसत्वकुटी। न वचे बैसली जे ललाटीं । यावत् घरटी रविचंद्रां।यालागीं हाचि उपाय सार । सौभाग्यनाथा केजे सधर । हे ऐकोनियां सुविचार। झाला तत्पर सत्राजित । सत्राजिताच्या पत्नीने त्याच्या म्हणण्याला तात्काळ मान्यता दिली. ती म्हणाली – पतिदेव! आपण सुचविलेला उपाय अगदी योग्य आहे. आपल्यावरील दोषाचे लांछन याशिवाय कशानेही नाहीसे होणार नाही. याशिवाय शेकडो उपाय केले तरी आपल्या माथी बसलेले लांछन हा सूर्य चंद्र असे पर्यंत नाहीसे व्हावयाचे नाही. नाथ! आपण हा उपाय तातडीने अमलात आणावा. करी धरूनि एकान्तासी । नेऊनि सांगे देवकापासीं। म्हणे माझिये निजमानसीं । गोष्टी ऐसी आवडतसे । सत्यभामा हे माझी दुहिता । उपवर सुन्दर सद्गुणभरिता। दैवविधानें कृष्णनाथा । पाणिग्रहणीं अर्पावी । विवरूनि नृपेंसीं हें मात । प्रार्थूनि वसुदेव कृष्णनाथ । हीन दीन मी अनाथ । कीजे सनाथ कृपेनें। देवकें रायासी कथिली मात । तेणें वसुदेव कृष्णनाथ। पाचारूनि हा वृत्तान्त। सत्राजितोक्त त्या कथिला । कृतागसत्वें व्रीडावान । आपुला सुहृद अनन्य शरण। त्यासी कृपेनें सनाथ करून। कन्यारत्न स्वकारीजे। येऊनि स्वमुखें करुणा भाकी। याहूनि कोण ते कीर्ति लोकीं। स्नेहगौरवें विश्वासमुखीं । सुहृद कौतुकें रंजविजे । हेंचि श्रे÷त्वा भूषण । सुहृद आप्त हीन दीन । कृतागसही झालिया शरण । आपणासमान त्या केजे ।ऐसें उग्रसेन भूपति। स्वमुखें बोधी धर्मनीति । सादर परिसोनि रुक्मिणीपति । ऐकिलें म्हणती जनकातें। वसुदेव आणि संकर्षण। म्हणती नृपाज्ञा कीजे मान्य। सोयरा सत्राजित प्राचीन । दुहिता प्रार्थून अर्पित । ऐसें विवरूनि नृपानिकटीं। सत्राजिताची मानिली गोठी। मग ब्राह्मविवाहपरिपाटीं । केली राहाटी लग्नाची ।ऐसा निश्चय स्वबुद्धीकरून। सत्राजितें दुहितारत्न । कृष्णाकारणें कन्यादान। विधिविधानें समर्पिलें। सत्यभामेच्या पाणिग्रहणीं। आंदण दिधला स्यमंतकमणि। एवं सुभगा लावण्यखाणी । चक्रपाणिप्रिय झाली । ऐसा सत्राजितें विवेक । रचूनि केली सोयरिक । लोकापवादाचा कलंक । क्षाळूनि शशाङ्कसम झाला। आता श्रीकृष्णाला ही प्रार्थना कशी करायची? श्रीकृष्ण आपली प्रार्थना स्वीकारेल काय? हे प्रश्न सत्राजिताला पडले. यासाठी त्याने प्रथम एकान्तात देवकीचा पिता देवक याला गाठले. त्याचे हात हातात घेऊन देवकाला तो म्हणाला-महाराज! माझ्या मनातील एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्यापाशी सांगायची आहे.
(क्रमशः)








