प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने आजची गोकुळ ची सुनावणी झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक स्थगित करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र आजची ही सुनावणी झालीच नाही. यामुळे आता सर्वांचेच लक्ष पुढील सुनावणीकडे लागून राहणार आहे.
सध्या जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीचे बिगुल वाजल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले पॅनेल जाहीर केल्याने प्रचाराला वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









