भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असतानाच मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी येडियुराप्पाच मुख्यमंत्रिपदी राहणार आहेत, असे सांगून अफवांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी आपण तीन-चार दिवसांत नवी दिल्लीला जाणार असल्याचे सोमवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले होते. त्यानंतर येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून दुसऱयाची नेमणूक होणार असल्याची अफवा पसरली आहे. हायकमांड पातळीवर तशी चर्चाही झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मंगळवारी उलटसुलट चर्चा रंगली. त्यामुळे हावेरी येथे पत्रकारांशी बोलताना नलीनकुमार कटील यांनी येडियुराप्पाच मुख्यमंत्रिदी राहणार आहेत. त्यांना पदावरून हटविण्याबाबत कोठेही चर्चा झालेली नाही. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले









