जेष्ठ नेते शरद पवारांनी दिली यांची माहिती
प्रतिनिधी / मुंबई
आपल्या प्रियसिला प्रपोज करण्यासाठी प्रियकर काहीतरी हटके स्टाईल शोधत असतात. कोण प्रेम प्रत्र देत तर कोण त्याच व्यक्तींच्या जवळच्या व्यक्तीकडून तिच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवतात. मात्र आजच्या या सोशल मिडियाच्या युगात प्रेमाचा रंगच बदलून गेलाय. इतकच नाही तर तरुणाई आता फिल्मी स्टाईलनेही प्रपोज करु लागलीय. असाच प्रपोज महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यांच्या मुलाने केलाय. तेही पॅरिसच्या आयफेल टॉवरवर.. या प्रपोज माहिती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. पवारांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही ‘गूड न्यूज’ दिली.
पवार यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात काहीशी हटके केली. त्यांच्या शेजारी बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाहत त्यांनी एक आनंदाची बातमी सांगितली. जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केल्याची वार्ता त्यांनी सांगितली. थेट पॅरिसमध्ये जाऊन प्रपोज केल्याचे सांगत आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असे पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









