ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष अशा काहीच तरतूदी नाहीत असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले.
त्या म्हणाल्या, यावर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी नवीन असे काहीच नाही आहे. मागील वषी महिलांबाबत ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याच याही वेळी जाहीर करण्यात आल्या आहेत.
तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेलाही पुरेसे अनुदान का दिले जात नाही,’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.









