प्रतिनिधी / चिकोडी :
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी सुखद क्षेत्रामधून बाहेर पडून आव्हानांना तोंड दिल्यास यश साधता येणे सहज शक्मय आहे, असे मत संकेश्वरच्या डॉ. शीतल भिडे यांनी व्यक्त केले.
येथील सीटीई संस्थेच्या आर. डी. पदवीपूर्व कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पीयुसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मनुष्यास अनुभव व अनुभूती द्वारे सर्वकाही शिकता येते. यशस्वी होण्यासाठी आव्हानांना तोंड देणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नवादी असले पाहिजे. आपल्या गरजा कमी असतील तर सुखद जीवनाचा आनंद घेणे सहज शक्मय आहे. उच्चस्थानी पोहोचल्यानंतर आपल्यामध्ये असलेली विनयता तशीच राहणे आवश्यक असते. राजासारखे जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम आपण सेवकाप्रमाणे कष्ट घेतले पाहिजे. या महाविद्यालयाकडून परिवारातील सदस्याप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी 2019- 20 या शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धा व परीक्षांमध्ये यश साधलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व पदके देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. एन. एस. चौगुले, कावेरी अमाते, सत्यवा बट्टय़ाबोळ, दीक्षा भबगौडा, सुप्रिया पाटील, दर्शनी बत्ते, आप्पासाहेब कांबळे, स्नेहा मोळगे व विनीत शहा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. एन. व्ही. शिरगावकर यांने स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. अहवाल वाचन राहुल ओतारी यांनी केले. कार्यक्रमास ज्ये÷ संचालक वाय. एस. मिरजी, प्राचार्य सी. व्ही. देशपांडे, प्रा यु. एस. शिंदे, चंद्रकांत कोलकार, अण्णासाहेब कांबळे, ज्योतीगौडा पाटील, प्रदीप माने, ए. एल. माने, सुरेश भोसले, महेश कुलकर्णी, सागर कवटगीमठ, मारुती जाधव यांच्यासह पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. प्रा. प्रकाश मनगुळी यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. प्रसन्न कुलकर्णी यांनी अभार मानले.