ऑनलाइन टीम / यवतमाळ :
यवतमाळ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीदरम्यान मोठा गदारोळ झाला होता. काही काळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना 4, भाजप 2, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. येथे महाविकास आघाडी आणि भाजपा असा सामना रंगला. पण ऐनवेळी राष्ट्रवादीचा सदस्याने भाजपासोबत घरोबा केला. तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेतील एका महिलेला आपल्या पाठिंब्यासाठी तयार केले होते.
दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱयांमध्ये चांगलीच झुंपली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं.









