वार्ताहर /बैलहोंगल
सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. माही पौर्णिमा असल्याने या दिवशी लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती यांनी दिली. यात्रेनिमित्त भाविकांचे लोंढे डोंगरावर येत आहेत. मंदिर फक्त देवीच्या दर्शनाला खुले असले तरी येणारे भाविक प्रथम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पुंडाच्या स्नानासाठी गर्दी करत आहेत. प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून योजना हाती घेण्यात आल्या आहेत.









