प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावरील यरगट्टीजवळ भरधाव बोलेरो पीकअपने कारला ठोकरल्याने कारमधील तिघे जण जागीच ठार झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. मृत बागलकोट जिल्हय़ातील असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती समजताच रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक शंकरगौडा पाटील, मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडुविनमनी, मुरगोडचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोळ आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तिन्ही मृतदेह शवागारात हलविण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटविण्याची व मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातानंतर काही काळ वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.









