म्हैसाळ सह परिसरात कृष्णेच्या महापुराने सुमारे ८५०० हेक्टर शेतीसह पिकांचे, घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले असून शासनाने तातडीने नुकसानभरपाई व सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी पुरग्रस्त शेतकऱ्यांनी व बाधित कुटुंबांनी केली आहे.
आता बरेचसे पूरग्रस्त आपापल्या मूळ ठिकाणी परतले असून आता परत संसार कसा उभा करायचा या विवंचनेत आहेत. ते सगळे आता शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देताना गावकामगार तलाठी सुधाकर कुणके म्हणाले, “बाधित घरांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून जसजसे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज येतील तसतसे बाधित शेती पिकांचे ही पंचनामे सुरू आहेत. यासाठी कृषि अधिकारी व सहाय्यक हे सहकार्य करीत आहेत.अद्याप ज्या बाधित शेतकऱ्यांनी अर्ज दिले नसतील त्यांनी तातडीने आपले अर्ज तलाठी कार्यालयात जमा करावेत”, असे आवाहन तलाठी कुणके यांनी केले आहे.