प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा कार्व्हालो पेट्रोल पंप नजिक असलेल्या चार दुकाने फोडून चोरटय़ांनी रोख रक्कम, पॅमेरा डिव्हीएटर, दारूच्या बॉटल्स आदी सामान चौरून नेले.
ही चोरी गुरुवारी रात्री झाली. सकाळी दुकाने उघडी केल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी दुकानाच्यामागच्या बाजूली प्रवेश करून पाठिमागचे दरवाजे तोडून आतमध्ये प्रवेश केला. गजानन नाईक यांच्या दुकानातील सिगरेट बॉक्स, एकूवा मरिन मधील पॅमेरा, डिव्हीएटर, रेखा बारमधील रोख आदी चोरून नेले. याबाबत म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.









