झरीच्या गढूळ पाण्याचा ग्रामस्थांकडून वापर : आरोग्यावर दुष्परिणामाची शक्मयता
प्रतिनिधी /वाळपई
गोवा मुक्त होऊन जवळपास 60 वर्षे संपली. मात्र सत्तरी तालुक्मयातील पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. असे असतानाच सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावातील देसाईवाडा याठिकाणी गेल्या तीन दिवसांपसून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांना झरीच्या पाण्यावर पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. पाणी पुरवठा कार्यालयाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावातील देसाईवाडा याठिकाणी गेल्या तीन दिवसांपसून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेले आहे. वाळपईच्या पाणी पुरवठा कार्यालयात तक्रारी करूनसुद्धा त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याचा या गावातील ग्रामस्थांचा दावा आहे. दोन महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन समाधानकारक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही प्रमाणात समाधानकारक पाणीपुरवठा होत होता. आता मात्र पुन्हा पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. काही नागरिकांनी सदर ठिकाणी काम करणाऱया ऑपरेटरमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले.
टँकरद्वारे पाणी पुरवठा मात्र असमाधानकारक
सध्यातरी सदर भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावातील इतर वाडय़ावर व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे मात्र देसाईवाडय़ावर अशी परिस्थिती का असा सवाल ग्रामस्थांनी केलेला आहे. पावसाळी मौसमात सुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही अशा प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या आहेत. गावांमध्ये टँकर येत असला तरीसुद्धा त्याची वेळ निश्चित नसल्याने अनेकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे इतर कामे बाजूला सारून टँकरची वाट पहावी लागत आहे अशी माहिती नागरिकांनी दिली.
झरीच्या गढूळ पाण्याचा वापर मात्र आरोग्यावर परिणामाची शक्यता.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नजीक असलेल्या एका झरीच्या पाण्यावर सध्यातरी नागरिक पाण्याची व्यवस्था करीत आहेत. सदर झरीतून गढूळ पाणी येत असून नाईलाजास्तव सदर पाणी वापरावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. सध्यातरी सदर भागातील नागरिक पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अत्यंत त्रस्त झाले असून याभागाचे आमदार व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री विश्वजित राणे याबाबत खरोखरच गांभीर्याने लक्ष देणार का असा सवाल केला आहे.









