” ‘आप’ गोव्यात पैसे कमावण्यास नाही तर भ्रष्टाचारमुक्त शासन देण्यास आले आहे ”
प्रतिनिधी / सुमित तांबेकर
आम आदमी पार्टीला फक्त एक संधी द्या गोव्याचा संपुर्ण आणि सर्वांगिण विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि गोव्याचे राजकारणातील टक्केवारीची पद्धत बंद केल्याशिवाय थांबणार नाही असा विश्वास आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला, ते दैनिक तरुण गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी पणजी येथे बोलत होते.
यावेळी केजरीवाल यांनी भाजप, राष्ट्रीय काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेस व इतर राजकिय पक्षांचा गोव्याच्या राजकारणावरुन खुरपुस समाचार घेत आम आदमी पार्टी गोमंकियांना विकासाचे धोरण राबवणार असल्याने भाजप, काँगेसवाले मला शिव्या द्यायला लागले असे केजरीवाल यावेळी म्हणाले. तसेच आप गोव्यात राजकिय दृष्ट्या सक्रिय होण्याचे एकच कारण असुन गोमंतकियांचा विकास तसेच गोव्याला एक इमानदार सरकार देणे जे गोव्यात दुरापास्त झाल्याचे ते म्हणाले. आम आदमी पार्टी गोमंतकियांशी प्रत्येक मुद्यावर चर्चा करते आहे. नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत. त्या सोडवण्यासाठी आम आदमी पार्टीला काय केले पाहीजे याचे ही नियोजन आम आदमी पार्टीने केल्याचे ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे दुकान भाजप खरेदी करणार
गेल्या पंचवार्षिक विधानसभेनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या दोन अपवाद वगळता बहुतांशी नेत्यांनी पक्षांतर करत भाजपसारख्या पक्षात प्रवेश केला होता. याची आठवण करुन देत केजरीवाल म्हणाले कि, या ही विधानसभेनंतर काँग्रेसचे दुकान भाजप खरेदी करणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षांतराच्याबाबतीत राष्ट्रीय काँग्रेसने जागतिक विक्रम केल्याचे ही ते उपरोधाने यावेळी म्हणाले. तसेच गेल्या २० वर्षात गोव्यात कोणता ही नवा उद्योग आला नाही, नवी रुग्णालये उभारली नाहीत, तसेच शाळा, महाविद्यालये विशेषरित्या गोव्यात उभारु न शकल्याची खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राजकारण्यांनी गोव्याला बदनाम केले.
अनेक नेत्यांनी पक्षांतर करत इतर पक्षात प्रवेश केला होता. ही तर गोमंतकियांची निव्वळ फसवणुक आहे. भाजपचे नेते सरळ सरळ इतर मंत्र्यांची बोली लावत त्यांना खरेदी करण्याची भाषा करातायेत त्यामुळे राजकारण्यांनी गोव्याला बदनाम केले असुन गोव्याला आता स्वच्छ आणि विकास करु पाहणाऱ्या नव्या चारित्र्यवाण चेहऱ्यांची गरज असुन यासाठी आम आदमी पार्टी गोमंतकियांच्या विश्वासास पात्र ठरेल तसेच सत्तेत असणाऱ्या अनेक नेत्यांचे हात भ्रष्टाचाराने काळे झाले आहेत. यामुळेच तर कोरोना सारख्या महामारीत आम आदमी पार्टीला लोकांच्या मदतीला धाऊन जावे लागले. आणि शासकिय यंत्रणा मात्र नागरीकांना आरोग्य सुविधा देण्यास तोकडी पडल्याचे ही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे गोव्यातील राजकाण्यांनी गोमंतकियांना बदनाम केले असल्याने त्यांना आज पर्यंत स्वच्छ चारित्र्याचे चेहरे हवे होते. ते आता आम आदमी पार्टीच्याद्वारे मिळतील असे ही ते यावेळी म्हणाले.
आम आदमी पार्टीने ठेवलेल्या अजेंड्याने जनतेचे पैसे जनतेत जातील
आज प्रत्येक ३ युवकातील २ दोन युवक हे रोजगाराच्या प्रतिक्षेत असुन ते उच्च शिक्षित असुन ही त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याची खंत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलेले उमेदवार अॅड. अमित पालेकर यांनी व्यक्त केली. गोव्यात सत्ताधाऱ्यांनी गोमंतकियांची लुट केली आहे. इतर वेळी घोटाळे तर आहेतच. पण कोरोना काळात ही सत्ताधाऱ्यांनी जनतेला पिळुन काढल्याचे पालेकर यावेळी म्हणाले. त्यामुळे आम आदमी पार्टी गोव्यात पैसे कमावण्यास आली नसुन ती गोमंतकियांना स्थिर , भ्रष्टाचारमुक्त आणि एक विकासाचे धोरण समोर ठेवल्याने आम आदमी पार्टीने ठेवलेल्या अजेंड्याने जनतेचे पैसे जनतेत जातील असे केजरीवाल यावेळी म्हणाले. यावेळी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल,आपचे नेते अॅड अमित पालेकर दैनिक तरुण गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.