डोसा, इडली इत्यादी खाद्यपदार्थ महागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेजारच्या किंवा छोटय़ा देशात राजकीय उलथापालथ सुरू असताना आपलं त्याच्याशी कुठलंच देणंघेणं नसल्याचा विचार करणे चुकीचा ठरतो. म्यानमारमध्ये सैन्याने निवडून आलेल्या सरकारला हटवून सत्तापालट घडवून आणल्याने तेथील नागरिक रस्त्यांवर उतरले असून तीव्र निदर्शने सुरू आहेत. याचदरम्यान सैन्य निदर्शने चिरडून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पूर्ण घडामोडींचा व्यापार आणि उत्पादनावरही प्रतिकूल प्रभाव पडत असून यामुळे महागाईला तोंड देणाऱया भारताच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे.
जर तुम्ही इडली, डोसा किंवा वडा यासारखे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचे शौकीन असाल तर तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकताहे. कारण म्यानमारमध्ये स्थिती आता पूर्वीसारखी नाही. तर भारत यापूर्वीच घरगुती सिंलिडरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांना तोंड देत आहे. वाहतूक महागली असून आता आयातही महाग होणार आहे.
म्यानमारशी इडली कनेक्शन
जर काळी उडिद डाळीचा म्यानमार दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारत येथूनच डाळींची मोठय़ा प्रमाणात आयात करतो. 15 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान म्यानमारमध्ये सत्तापालटाचा प्रभाव राहिला आणि याचदरम्यान भारतात काळय़ा उडिद डाळीचे दर चांगलेच महागले आहेत. मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत हे दर 97 रुपये प्रतिकिलोवरून 110 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ दुकाने म्हणजेच ग्राहकांना ही डाळ 117 रुपयांऐवजी 130 रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे. तर काळय़ा उडिद डाळीची किंमत दिल्लीत 100 रुपयांच्या जागी 123 तर लखनौमध्ये 113 ऐवजी 145 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.
दर आणखीन वाढणार
काळी उडिद डाळ उत्तर भारतातील भोजनाचा प्रमुख हिस्सा आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रसिद्ध खाद्यपदार्थ इडली, डोसा आणि वडा इत्यादींमध्ये प्रामुख्याने वापरली जाते. म्यानमारमधील स्थिती लवकर बरी होण्याची शक्यता नाही, याचमुळे डाळीचे भाव अधिक वाढू शकतात. कारण आयात पूर्वीच्या पातळीवर येण्यास बराच वेळ लागू शकतो. दोन्ही देशांमध्ये कॅरीओव्हर स्टॉक कमी राहिला आहे. कारण हे पिक अतिवृष्टीमुळे वाया गेले आहे. म्यानमार आणि भारतात हे पिक बाजारपेठेत डिसेंबर आणि सप्टेंबरमध्ये येते, याचमुळे दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भारत सरकारने म्यानमारपासून 4 लाख मेट्रिक टन उडिद डाळीचा कोटी जारी केला होता. पण ही आयात पूर्ण होणे चालू वर्षात शक्य वाटत नाही. भारताच्या एकूण उडिद डाळ आयातीत 84 टक्के वाटा म्यानमारचा आहे. यातील 78 टक्के आयात यंगून बंदरावरून चेन्नईच्या बंदरादरम्यान होते.
निर्भरतेचे कारण काळय़ा उडिद डाळीचे देशातील उत्पादन 2017-18 मध्ये 34 लाख मेट्रिक टन राहिले होते. तर 2019-20 मध्ये 20 लाख मेट्रिक टनच राहिले. तर म्यानमारमधील शेतकरीही आता याच्याऐवजी मूग आणि अन्य डाळींच्या शेतीकडे वळले आहेत, कारण मूगाची चीनकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत आहे.