रत्नागिरीतील कोकणनगरमधील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील कोकणनगर येथे मोलकरणीने प्रियकराच्या मदतीने दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आह़े या प्रकरणी दोघा संशयितांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े अल्तमश अय्युब झारी (35, ऱा कोकणनगर) यांनी चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी
प्रज्ञा गोरे व तिचा प्रियकर शुभम करंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत़ या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्तमश झारी यांची आई आजारी असल्याने त्यांनी प्रज्ञा गोरे हिला देखभाल करण्यासाठी ठेवले होत़े यावेळी झारी यांच्या आईने आपले दागिने कपाटात ठेवल्याचे त्यांना सांगितले होत़े झारी यांच्या आईचे निधन झाल्यानंतर झारी ते कपाटामध्ये ठेवलेले दागिने पाहण्यासाठी गेल़े यावेळी दागिने चोरीला गेल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल़ा
42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 30 हजार किंमतीची सोन्याची चेन, 10 हजार किंमतीचे सोन्याचे रिंग, 1 हजार किंमतीची सोन्याची चमकी व 1 हजार रूपये रोख आदी 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला, अशी तक्रार झारी यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.









