हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई, चार वाहने जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरुन हिरेबागेवाडी पोलिसांनी शुक्रवारी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या तरुणाने बेळगाव शहर, धारवाड व गोकाक येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. केए 24 ईए 1787 क्रमांकाची हिरो स्प्लँडर प्लस, केए 22 ईएस 3425 क्रमांकाची होंडा शाईन, एमएच 09 बीव्ही 9822 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लँडर प्लस, केए 25 एचडी 2340 क्रमांकाची होंडा ग्राझीया अशा चार चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.









