प्रतिनिधी \ बेळगाव
भरधाव मोटार सायकल झाडावर आदळून देवगिरी (ता. बेळगाव) येथील एक तरुण ठार झाला. मंगळवारी रात्री देवगिरीहून बेन्नाळीला जाताना ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
वजीर सुरेश कुंबरगी (वय 27, रा. देवगिरी) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. केए 22 एचबी 7120 या मोटार सायकलवरुन बेन्नाळीकडे जाताना ही घटना घडली आहे. या अपघातात त्याच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्याचे वडील सुरेश कुंबरगी यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी हे पुढील तपास करीत आहेत.









