कोडगू/प्रतिनिधी
येत्या दोन दिवसांत मुसळधार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कोडागु जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या कोडागु उपायुक्त अण्णा कानमणी जॉय यांनी डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना मैदानी भागावर जाऊन राहण्यास सांगितले आहे. तसेच भूस्खलनाबाबत सावधगिरी बाळगायला हवी असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
जिल्ह्यातील भागमंडाळा, तालकावेरी, मडिकेरी आदी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला असून नद्या ओसंडून वाहत आहेत. कुशलनागराजवळील हरंगी जलाशयामध्ये पाण्याचं जोरदार ओघ सुरु आहे. जलाशयाची पूर्ण पाणी पातळी 2859 फूट इतकी आहे.
बुधवारी मडिकेरी-भागमंडळा मार्गावर काही प्रमाणात दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. कोडागु पोलिस अधीक्षक क्षमा मिश्रा यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.