म्हापसा-कुचेली येथील प्रकार
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा नगरपालिका तसेच स्थानिक कोमुनिदादच्या अख्यतारित येणाऱया कुचेली येथील फुटबॉल मैदानात अज्ञातांकडून डीमार्कींग करून तेथे मोटय़ा इमारती उभारण्याचा डाव असून हे ग्रामस्था?चा लक्षात आल्याने रविवारी सकाळी शेकडो स्था?निक तरुण मैदानात एकत्रित आले. आमी कोणत्या परिस्थितीत येथे इमारती उभारू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी गावांतील तरुणांनी गावात क्रिडाप्रकारासाठी उपलब्ध असलेल्या एकमेव मैदानात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास तरुणाईच्या जोरावर तो हाणुन पाडला जाणार असल्याचे स्थानिक क्रिकेटर यांनी सांगितले. दरम्यान, येथील प्रकार कानावर पडताच उत्तर गोवा कॉग्रेसचे उपाध्यक्ष विजय भिके, राष्ट्रवादी कॉग्रेसचे संजय बर्डे , शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सामाजिक कार्यकर्ते जवाहर शेटय़?, शेखर नाईक, प्रवीण आसोलकर तसेच म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक शेखर बेनकर आदी उपस्थित होते.
गेली शेकडों वर्षे याभागातील तरुणाईकडून येथील मैदानाचा क्रिडांगण म्हणुन उपयोग केला जात आहे इतकेच नव्हे तर आमच्या बालपणातही येथील मैदानात अनेकदां आपण सुद्धा खेळलेलो आहे, अशा पारंपरिक आणी एकमेव मैदानाचे पुढील पीढीसाठी जतन करुन ठेवणे आज काळाची गरज असून स्थानिक तरुणांचे हीत लक्षात न घेतां या मैदानी जागेत व्यवसायिक अथवा अन्य प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाकडून यागोष्टीला प्रखर विरोध करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते संजय बर्डे यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक लोकांना अंधारात ठेऊन स्थानिक नगरपालिका तसेच कोमुनिदादकडून अशा प्रकारे येथील पारंपरिक मैदान लाटण्याचा प्रयत्न झाल्यास उत्तर गोवा कॉग्रेस पक्ष अशा गोष्टींचा पुर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याचे विजय भिके यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून सांगितले. दरम्यान, शिवसेना पक्ष सदोदित स्थानिक जनतेच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणी यापुढेही राहाणार असून स्थानिक जनतेच्या विरोधात नगरपालिका असो अथवा स्थानिक कोमुनिदाद त्यांचे मनसुबे उधळून लावण्यास सदैव सज्ज असल्याचा इशारा शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी यावेळी संबंधितांना दिला.
नगरसेवक शेखर बेनकर यांनीही आपण स्थानिक तरुणांच्या बरोबर राहुंनच येथील प्रकाराची शहानिशा करण्यास तयार असल्याचे स्थानिक तरुणांना आश्वासन दिले.









