मुंबई \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं होतं. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघ ठरवत असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक भेटीवर प्रश्न करण्यात आला होता. तसेच शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याचे विचरले असता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. यामुळे जमवून घ्यावे लागते. परंतु मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजा मारू शकतो, असा इशारा छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन बराच वाद सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचं नाव विमानतळाला देणे नाकारले असते. जे.आर.डी.टाटा यांचं नाव विमानतळाला द्यायला बाळासाहेबांनी सुचवले असते, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. दी. बा. पाटील यांच्याही नावाला आमचा पाठिंबा आहेच परंतु नामकरणाचा मुद्दा बसून सोडवला पाहिजे, असे मत छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








