वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया मेलबर्न स्टार्स संघाने पाकचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफशी नवा करार केला आहे. यापूर्वी रौफने या स्पर्धेत मेलबर्न स्टार्सकडून खेळताना 10 सामन्यात 20 बळी मिळविले होते.
28 वर्षीय हॅरिस रौफने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 8 वनडे आणि 32 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते. रौफने 2020 साली वनडे आणि टी-20 प्रकारात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियातील होणाऱया बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेसाठी मेलबर्न स्टार्स संघाने रौफबरोबर नवा करार केल्याची माहिती या संघाचे सरव्यवस्थापक क्राऊच यांनी दिली. आता 27 डिसेंबरला होणाऱया बिग बॅश लीग स्पर्धेतील मेलबर्न स्टार्स आणि ब्रिस्बेन हिट यांच्यातील सामन्यात रौफ खेळणार आहे.









