ऑनलाईन टीम / शिलांग :
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोनराड संगमा यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या माझ्यामध्ये सौम्य लक्षणे आढळली असल्याने, त्यानंतर मी होम आयसोलेट झालो आहे.
तसेच त्यांनी मागील 5 दिवसात जे कोणी आपल्या संपर्कात आले होते, त्यांना स्वतः ची कोरोना चाचणी करण्यास सांगितले, तसेच स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.