पत्रकार परिषदेत जिल्हा न्यायाधीश सी. एम. जोशी यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ामध्ये एकूण 1 लाख 25 हजार खटले प्रलंबित आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी तसेच गोर-गरीब पक्षकारांना मोफत आणि तातडीने निकाल देण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले जाते. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता 27 मार्च रोजी मेगा लोकअदालत भरविण्यात येणार असून पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे चेअरमन सी. एम. जोशी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी शेतकऱयांच्या जमिनी विविध कामांसाठी सरकारने घेतल्या आहेत. त्याच्या नुकसान भरपाईबाबत असलेले खटलेही निकालात काढले जाणार आहेत. याचबरोबर फौजदारी, दिवाणी, प्रलंबित कर्ज, बँक वसुली, वीमा, वीज बिल, चेक बॉन्स हे सर्व खटले या लोकअदालतीमध्ये निकालात काढले जाणार आहेत. तेंव्हा पक्षकारांनी आता याबाबत आपली नावे नोंदवावीत. आपल्या वकिलांना याबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव, न्यायाधीश विजय देवराज अर्स हे उपस्थित होते.









