वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील प्रमुख ऍक्सिस बँक लवकरच मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचा जवळपास 29 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सदरचा व्यवहार हा जवळपास 1600 कोटी रुपयांना होण्याचा अंदाज आहे. या व्यवहारानंतर ऍक्सिस बँक मॅक्स इन्शुरन्समध्ये योजना आखण्याची तयारी करणार असल्याचेही म्हटले आहे.
या प्रकरणाच्या बाबतीत मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड समभाग विक्रीच्या आधारे मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये आपली 28.6 टक्के इतकी हिस्सेदारी 1600 कोटी रुपयांना विकणार आहे. परंतु या व्यवहार कंपनीच्या मंडळाकडे अजून सादर करण्यात आला नाही.
फेब्रुवारीत गुप्त करार
उपलब्ध माहितीनुसार मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ऍक्सिस बँक यांच्यात मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये गुप्त करार करण्यात आला आहे. हा करार फेब्रुवारी 2020 मध्ये करण्याचे सांगितले आहे. ऍक्सिस बँकेची अगोदरची हिस्सेदारी 2 टक्के आहे. ती या व्यवहारानंतर आणखीन वाढणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
ऍक्सिस बँक चौथ्या तिमाहीत तोटय़ात
खासगी क्षेत्रातील तिसऱया क्रमाकांची बँक म्हणून ऍक्सिस बँकेला ओळखण्यात येते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या चौथ्या तिमाहीत बँकेला नफा कमाईत 1,387.78 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीएमध्ये या दरम्यान घसरण झाली आहे, अशी माहिती बँकेने दिली आहे. डिसेंबर तिमाहीत 1,757 कोटी रुपयांचा निव्वळ नफा बँकेला झाला होता तर बँकेला व्याजाच्या स्वरुपात मिळणाऱया उत्पन्नात मात्र 19.3 टक्क्मयांची वाढ नोंदवण्यात आली. समाप्त झालेल्या तिमाहीत देण्यात आलेल्या कर्ज वाटपात वर्षाच्या आधारे 15 टक्क्मयांनी वाढ होत 5,71,424 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याचे सांगितले आहे.









