वृत्तसंस्था/ अबु धाबी
येथे झालेल्या शॉर्ट कोर्स विश्व जलतरण स्पर्धेत कॅनडाची महिला जलतरणपटू मॅगी मॅक्नीलने महिलांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदकासह नवा विश्वविक्रम नोंदविला.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कॅनडाच्या मॅक्नीलने महिलांच्या 100 मी. बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. महिलांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये मॅक्नीलने 25.27 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकासह नवा विश्वविक्रम नोंदविला. तिने यापूर्वी या क्रीडाप्रकारात नोंदविलेला किरा टोसेन्टचा विश्वविक्रम 0.33 सेकंदाने मोडीत काढला. 50 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात कॅनडाच्या मॅसीने रौप्य तर स्वीडनच्या लुईस हॅन्सनने कांस्यपदक मिळविले.









