मुद्रांक शुल्क कपातीनंतर 4148 दस्तांची नोंदणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
मुदांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे मालमत्ता खरेदी-विक्रीला तेजी आली आह़े सप्टेंबर महिन्यात 1 हजार 769 तर ऑक्टोबरमध्ये 2 हजार 379 खरेदी-विक्रीची नोंद झाली आह़े मे ते ऑक्टोबर या दरम्यान एकूण 2हजार 379 दस्तांच्या माध्यमातून 5 कोटी 84 लाख मुदांक शुल्क मिळाल्याची माहीती नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून देण्यात आली.
या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यामध्ये एकाही दस्ताची नोंद झाली नव्हत़ी सप्टेंबर महीन्यामध्ये शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली होत़ी त्यामुळे टाळेबंदीमुळे थबकलेल्या दस्तनोंदणीला सुरुवात झाल़ी मुद्रांक शुल्कात कपात केल्याने गृह खरेदी व्यवहारांनी गती घेतली आह़े ग्रामीण भागासाठी मुद्रांक शुल्कामध्ये 5 वरुन 2 तर शहरामध्ये 6 वरुन 3 टक्के अशी कपात करण्यात आली. या कपातीचा सर्वाधिक फायदा शहरातील सदनिकाधारक घेत असल्याचे सांगण्यात आल़े गतवर्षी सप्टेंबरमध्ये 1 हजार 402 व ऑक्टोबरमध्ये 1 हजार 538 दस्तनोंदणी झाली होत़ी यंदा मुदांक शुल्क कपातीचा परिणाम दिसून येत आह़े
महिना दस्त नोंदणी
- एप्रिल –
- मे 247
- जून 902
- जुलै 793
- ऑगस्ट 1021
- सप्टेंबर 1769 ऑक्टोबर 2379









