प्रतिनिधी / सरवडे
मुदाळ ता. भुदरगड येथील ग्रामीण कृषि कार्यक्रमात बारामती येथील पवार कृषि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली पुजा संभाजी पाटील व तळसंदे येथे डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली पुनम घनशाम पाटील यांनी मुदाळ येथे कृषि मालाचे शीतगृह याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी सुमारे प्रगतशील ५० हून अधिक शेतकरी उपास्थित होते.
मानवनिर्मीत साधनापासून तयार करण्यात येणारे शीतगृह खर्चाशिवाय उभा करता येते. शेती मालाची साठवण, नाशवंत फळभाज्या यांना टिकवुन ठेवण्यासाठी अशा प्रकारचा शुन्य उर्जा चेंबरचा वापर करावा या चेंबरचे तापमान सुमारे १५ ते २० अंश सेल्सीग्रेडने कमी असल्याने चार दिवसापेक्षा अधिक काळ पालेभाज्या, फळभाज्या, टीकून रहातात शिवाय त्याचे पोषकत्व कायम टीकून राहते.
सध्या कोरोनामूळे लॉकडाऊनस्थीती आहे. भाजीपाला, फळभाज्या, ना पुरेसे मार्केट नाही. यामुळे हा एक चांगला पर्याय असल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. प्रगत कृषिउद्योगात अशा वीजेशिवाय नैर्सीगक साधन संपत्तीवर चालणारा शुन्य उर्जा प्रकल्प चेंबर कृषिक्षेत्राला हितवाह ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रात्याक्षिक सादर करताना सोशल डिस्टन्सीग,जरुर त्या खबरदारीची उपाययोजना केली होती.
यावेळी मुदाळ येथील तानाजी शामराव पाटील, संतोष पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, देवदास पाटील, बाजीराव पाटील, बाळासो पाटील, बाबुराव पाटील , घमशाम पाटील, संभाजी पाटील, आदीसह शेतकरी उपास्थित होते. दरम्यान या उपक्रमाचे जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी कौतुक केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








