ऑनलाईन टीम / मुंबई :
आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नबाव मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी छापे टाकले. त्यानंतर 8 तास ईडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर मालिकांना अटक करण्यात आली. डी-कंपनीच्या एका सदस्याची 200 कोटींची संपत्ती ही नवाब मलिकांच्या कुटुंबातील लोकांच्या नियंत्रणात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मलिकांना अटक केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळय़ांना राजीनामा द्यावा लागेल.
एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला. एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एका नेत्याला दोन पत्नी आहेत, अशी मोठी यादी आहे माझ्याकडे. महाविकास आघाडीमध्ये हे चाललंय काय?, सगळंच कोलमडलं आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.