ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर मजूर प्रवर्ग आणि नागरी सहकारी बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होत असतानाच सहकार विभागाकडून दरेकरांना अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर दरेकर यांना मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. यापूर्वीही ते मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, सहकार विभागाने यासंदर्भात सर्व कागदपत्रे देऊनही पोलीस दरेकरांवर गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर दोन महिन्यांनी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.








