प्रतिनिधी – खेड
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील ७ मालमत्तांचा स्मगलर्स अँण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून मंगळवारी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे लिलाव करण्यात आला. दाऊदचा दुमजली बंगला वकील अजय श्रीवास्तव यांनी ११ लाख ३० हजाराची बोली लावून विकत घेतला. दाऊदच्या सात मालमत्तांपैकी सहा मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मालमत्ता विकत घेणारे दोघेही दिल्लीतील आहेत. सातवी मालमत्ता लिलावातून बाद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
१९९३ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर चर्चेत आलेल्या डॉ. दाऊद इब्राहिम याच्या मुंबकेतील दोन मजली बंगल्यासह ६ जमिनी, आंबा कलमाची बाग व लोटे येथील एक फ्लॉट शासनाच्या ताब्यात गेल्या होत्या. गतवर्षी दाऊदच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांचे अँन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यनिर्धारणही करण्यात आले होते. दाऊदच्या मालमत्तांचा व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे लिलाव करण्याचे जाहीर झाल्यानंतर सायऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली होती.
मालमत्ता लिलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बोलीधारकांसह मालमत्तांची पाहणी देखील केली होती. अखेर मंगळवारी मुंबई नरीमन पॉईंट येथील सेफेमा बिल्डींगमध्ये मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पार पडली. दाऊदच्या दुमजली बंगल्यासह जमिनी व आंबा कलमाच्या बागेचा डिजिटल पद्धतीने मुंबईतूनच लिलाव झाला. या लिलाव प्रक्रियेत स्थानिकही सहभागी होणार होते. मात्र, लिलाव प क्रियेदरम्यान एकही स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाला नसल्याचे समजते.
वकील अजय श्रीवास्तव यांनी दुमजली बंगल्यासाठी ११ लाख ३० हजाराची बोली लावत दाऊदच्या आईच्या नावावर असलेला सर्व्हे नं. १८१ ( घर क्रमांक १७२ ) २७ गुंठे जागेतील दुमजली बंगला विकत घेतला. याशिवाय सर्वे नं. १५३ ( २४ गुंठे ) मालमत्तेचाही समावेश आहे. भुपेंद्र भारद्वाज यांनी सर्व्हे नं. १५१ ( २७ गुंठे ), सर्व्हे नं. १५२ ( २९ गुंठे ), सर्व्हे नं. १५० ( २० गुंठे ), सर्व्हे नं. १५५ ( १८ गुंठे ) आदी मालमत्तांवर बोली लावत विकत घेतल्या. दाऊदची सातवी मालमत्ता लिलावातून बाद झाली असून इकबाल मिर्चीच्या मालमत्तेवर बोली लागली नसल्याचे समजते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









