ऑनलाईन टीम / मुंबई
मुंबईतील कुर्ला परिसरात एका दोन मजली इमरातीला भीषण आग लागली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशमनच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कुर्ला पश्चिमेतील मेहताब ही २ मजली निवासी इमारत आहे. इमारतीला आग लागल्यानंतर सिलेंडरच्या स्फोटाचे आवाजही आले आहेत. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









