चौपाटी, बागा आणि सार्वजनिक ठिकाणी जण्यास बंदी
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत नववर्षाच्या उत्सवादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेता संपूर्ण शहरात 15 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या जमावबंदीमुळे आता एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी असणार आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी लोकांना संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत समुद्रकिनारी, मोकळे मैदान आणि उद्यानात जाण्याचा अटकाव केला आहे.
या कारवाईत महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.’ नागरिकांनी घरीच यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने मोकळ्या जागा किंवा हॉलमध्ये लोकांची गर्दी 50 लोकांपर्यंत मर्यादित केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4,333 सक्रिय रुग्ण असून, ओमायक्रॉनची 450 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत