मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना आज परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती बरी असून त्या रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहेत.
रविवारी (18 जुलै) सकाळी किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांच्या उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








