मुंबई
नेपाळ एअरलाईन्स कॉर्पोरेशन (एनएसी) 27 मार्चपासून मुंबई-काठमांडू विमान सेवा पुन्हा सुरु करणार आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं जवळपास दोन वर्षांपासून बंद होती, ती पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे एनएसी यांनी सांगितले आहे. भारत सरकारने 27 मार्चपासून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मान्यता दिली आहे. यानंतर नेपाळच्या राष्ट्रीय एअरलाईन्सने हा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई ते काठमांडू या मार्गावर एअरबस-320 सोबत रविवार, बुधवार आणि शुक्रवारी आठवडय़ाला तीन विमाने सोडणार आहे.









