वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने लंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक न्यूझीलंडचा शेन बाँड याने आपले पद सोडल्याने त्याच्या जागी लसिथ मलिंगाची नियुक्त केली आहे.
लंकेच्या 40 वर्षीय मलिंगाने यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचे आयपीएल स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले होते. आता मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षक वर्गामध्ये मलिंगाचा समावेश राहिल. प्रशिक्षक वर्गामध्ये मार्क बाउचर, किरॉन पोलार्ड यांचाही समावेश आहे. मलिंगाने 2008 पासून जवळपास 13 वर्षे मुंबई इंडियन्स संघाच्या संपर्कात आहे. यापैकी त्याने 11 वर्षे खेळाडू म्हणून तर एक वर्ष गोलंदाज मेंटर म्हणून कार्यरत होतो. 2015 पासून मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाज प्रशिक्षक पदाची जबाबदारी शेन बाँडकडे होती. बाँडने आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दीत चारवेळा आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.









