वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मीडियाटेकने आपल्या एक्झीक्यूटिव्ह वर्चुअल समिती 2020 मध्ये डायमेंसिटी 700 प्रोसेसरचे सादरीकरण केले आहे. यामध्ये 7 एनएम 5 जी चिपसेटची निर्मिती करण्यात आली असून हा सर्वात लेटेस्ट प्रोसेसर असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदर चिपची निर्मिती ही मास मार्केटसाठी तयार करण्यात आली आहे. नवीन सिस्टम-ऑन-चीप (एसओसी) मिड-रेंज 5 जी स्मार्टफोनमध्ये वापरण्याची सोय मिळणार असल्याचे सांगितले आहे. याचदरम्यान मीडियाटेकने क्रोमबुक्ससाठी चीपसेट एमटी8195 आणि एमटी8192 याचेही सादरीकरण करण्यात आले आहे.
नवीन 5 जी सुविधा असणाऱया स्मार्टफोनसाठी हाय-एण्ड प्रोसेसरची सोय मिळणार आहे. जी 6 एनएम टेक्नॉलॉजी आणि एआरएम कोरटेक्स-ए78 कोर यावर आधारीत राहणार आहे.









