‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल इतिहास, शौर्य, धाडस व पराक्रम प्रेक्षकांसमोर मांडता आला. या चित्रपटातून खरी प्रेरणा मिळाली आणि हा चित्रपट सर्वोत्तम चित्रपट म्हणून नावारुपाला आला, असे विचार ज्ये÷ सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी मांडले.
संमेलनातील पाचव्या सत्रात उद्योजक भरत देशपांडे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मराठी-हिंदी चित्रपटात काम करताना आलेला अनुभव रसिकांसमोर मांडले. अभिनेते खेडेकर यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाविषयी तुम्हाला काय वाटतंय? या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना खेडेकर म्हणाले, या चित्रपटातून महाराजांचा संदेश थोडय़ाफार प्रमाणात प्रेक्षकापर्यंत पोहचवता आला हेच मोठं काम आहे. एखाद्या चित्रपट तयार करायचा असेल कोणीतरी लिहावं लागतं. त्यानंतर दिग्दर्शक तो चित्रपट प्रदर्शित करतो. त्यामुळे लेखनिकाबरोबर दिग्दर्शकाचे काम महत्त्वाचे आहे.
1990 ते 2019 या काळात वाटचाल करताना सर्वोत्तम भूमिका कोणती?
– प्रत्येक नाटकात व चित्रपटात यशस्वी झालेल्या भूमिका सर्वोत्तम असतात. कारण त्या मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांनी पाहिलेल्या असतात. त्या भूमिकेविषयी केलेला अभ्यास लोकांनी चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलेला असतो. डॉ. आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस याही सर्वच भूमिका श्रेष्ठ आहेत.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या भूमिकेतून कसे बाहेर आलात? आणि त्यानंतरच्या भावना काय होत्या?
– मी नट व्हायचं ठरवलो होतो. त्यासाठी विविध भूमिका करून त्या पद्धतीने जगल पाहिजे, असे वाटले. ‘नट’ म्हणून मुख्य प्रवाहात राहण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. या खडतर प्रवासासाठी दिनकर भोसले यांचे सहकार्य मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सिनेसृष्टीकडे कसे वळलात?
– मी सुरुवातीला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन दोन वर्षे नोकरी केली. कौटुंबिक पाठबळ किंवा विशेष कशी कोणाची ओळख नव्हती. नाटक, अभिनय करायला आवडत होते. आणि या हव्यासाचे रूपांतर नटामध्ये झाले. सुरुवातीच्या मराठी मातृभाषेच्या अभ्यासामुळेच मराठी रंगभूमीवर येता आले. केलेल्या कामाची आस्था व घरांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे इथपर्यंत
पोहचलो.
नाटक आणि सिनेमा याबद्दल तुम्हाला काय वाटते?
– नाटकाला मोठी परंपरा असून नाटक करणे आव्हात्मक असते. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकांमुळे नाटकांना प्रेक्षकांची पसंती व संख्या कमी होत आहे. सुरुवातीला नाटकांमध्ये बरेच प्रयोग करून मी यशस्वी झाला आहे. त्यामुळे नाटकांना विसरून चालणार नाही, असेही सचिन खेडेकर म्हणाले.









