मुंबई / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्शचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे दिल्ली कॅपिटल्सला दिलासा मिळाला. यापूर्वी मार्शचा रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पूर्ण संघाला क्वारन्टाईन केले गेले होते. मार्शचा आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्याने दिल्ली कॅपिटल्स-पंजाब किंग्स यांच्यातील बुधवारची लढत पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे होणे अपेक्षित आहे.
यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले फिजीओ पॅट्रिक फॅरहार्ट यापूर्वीच आयसोलेट पेले गेले असून अन्य सर्व आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्याचे संकेत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोमवारी पुण्याकडे रवाना होणार होता. पण, नंतर त्यात बदल करण्यात आला. आयपीएल टेस्टिंग प्रोटोकॉलप्रमाणे आयपीएल संघातील प्रत्येक खेळाडूची पाच दिवसातून एकदा चाचणी केली जाते. मागील वर्षी प्रत्येक तीन दिवसातून एकदा चाचणी घेतली गेली होती.









