वॉशिंग्टन
अमेरिकेला पहिल्या महिला उपाध्यक्षानंतर आता पहिली संरक्षणमंत्रीही मिळण्याची शक्यता आहे. देशाचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनात मिशेल फ्लॉरनॉय यांना ही जबाबदारी मिळू शकते. पेंटॉगानची धुरा मिळाल्यास फ्लॉरनॉय यांना बजेटमधील कपातीसंबंधीच्या आव्हानाला तोंड द्यावे लागू शकते. तसेच कोरोना लस वितरणात सैन्याच्या योग्य भागीदारीवरही लक्ष द्यावे लागणार आहे. 59 वर्षीय फ्लॉरनॉय यांनी यापूर्वीही पेंटॉगॉनमध्ये सेवा बजावली आहे.









