दोन किलो गांजा जप्त, शहर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील टाकळी रोड येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या पुणे येथील तरुणासह दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन किलो, 70 ग्रॅमचा सुमारे 40 हजार रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाई वरून शहरात गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुमित संजय सरगर (वय 26, रा. रामनगर, क्रांती मित्र मंडळ येरवडा, पुणे) आणि अजित मधुकर सरगर (वय 25, रा. सुभाषनगर, मिरज) या दोघांचा समावेश आहे.
सुमित सरगर आणि अजित सरगर हे दोघे चुलत भाऊ आहेत. सदर दोघे गांजा विक्रीसाठी टाकळी रोड येथे येणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावून सदर दोघांना पडकले. त्यांच्या जवळ दोन किलो, 70 ग्रॅम गांजा मिळून आला. दोघांनाही अटक केली असून, सदर गांजा कोठून आणला, तो कोणाला विक्री करायचा होता, याबाबत अधिक तपास सुरू आहे.