प्रतिनिधी /मिरज :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असतानाही विनामास्क मोकाट फिरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्स न पाळता कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या 29 व्यक्तींवर महात्मा गांधी चौकी आणि मिरह शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पोलिसांकडून कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली आहे.
महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या वतीने स्टँड रोड, कुपवाड रोड, एमआयडीसी परिसरातील आयोध्यानगर भागासह गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दिवसभर मोहिम राबविण्यात आली. यावेळी विनामास्क विनामाकारण फिरणाऱया वाहनधारक आणि पादचाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी 19 व्यक्ती विनामास्क फिरत असताना आढळून आल्या असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच मिरज शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लक्ष्मी मार्केट, लोणी बाजार, बोकड चौक, गाडवे चौक, रेवणी गल्ली, दत्त चौक परिसरात कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यावेळी 10 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. कोरोनाचा उपद्रव अद्याप जिह्यात आणि महापालिका क्षेत्रात कमी झाला नाही. याचे भान नागरिकांना नाही. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा तपासणी मोहिम हाती घेतली आहे. कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188, 270 आणि 271 कलमांतर्अत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.