डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस
मिरज / प्रतिनिधी
कोरोना साथीच्या काळात कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेल्या मिरज शासकीय रुग्णालय व सांगली येथील शासकीय रुग्णालयातील सुमारे तीनशे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसून आले नसल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांनी दिली.
कोरोना लसीकरणाबाबत समाजामधील गैरसमाज दूर करण्याचाही संदेश याद्वारे देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. रुपेशकुमार शिंदे, डॉ. प्रकाश गुरव, डॉ. रजनी जोशी, डॉ. भास्कर मूर्ती, डॉ. नंदकेश्वर गायकवाड, डॉ. शिरीष मिरगुंडे, डॉ. शेखर प्रधान, चंद्रकांत शिंत्रे यांच्यासह येथील अधिकारी, सर्व विभागप्रमुख, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली.