सांगली जिल्हा लिंगायत समाजाची मागणी
प्रतिनिधी/मिरज
शहरातील मिरज रेल्वे जंक्शनला जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांचे नाव द्यावे अशी मागणी सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली. मंगळवारी माजी महापौर विजयराव धुळूबुळू, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, नगरसेवक गणेश माळी, संजय मेंढे, संगिता हारगे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, विराज कोकणे, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह तालुक्यातील लिंगायत समाजाच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना यामागणी विषयी माहिती दिली.