ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
वार्ताहर / सलगरे
मिरज पूर्व भागातील अनेक गावे सध्या अंधारात आहेत. लिंगनूर ता. मिरज येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून सुमारे 16 ट्रांसफार्मर अचानक बंद करण्यात आले आहेत. उपकेंद्रातर्गत अनेक ग्राहक थकबाकीदार असल्याने, विद्युत महावितरणच्या पुणे विभागीय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडीत केला असल्याचे महावितरण अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
तर ग्रामस्थांकडून वीज बिले भरले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने बहुतांशी गावांमध्ये शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.









