काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकार्यातून भाजपाचा बिनविरोध सभापती
प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे अंकलीच्या त्रिशला प्रमोद खवाटे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. खवाटे आणि गितांजली कणसे यांच्यात सामंजस्यपणे बोलणी झाल्याने चिठ्ठय़ांऐवजी बिनविरोध निवडीला भाजपाने प्राधान्य दिले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही निवडीसाठी विरोध दर्शविला नाही. निवडीनंतर अंकली ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली.








