दूधदुभत्यासाठी प्रसिद्ध असणाऱया डेन्मार्क या देशामध्ये मिंक या प्राण्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे वाढत आहेत, असे सांगण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी अशी 214 प्रकरणे आढळली. त्यामुळे या देशाचे सरकार मिंक पासून होणाऱया संसर्गाला रोखण्यासाठी उपाय योजना करीत आहे. या देशात प्रतिदिन एकंदर कोरोना रूग्णसंख्या 20 हजारांहून अधिक आहे. त्यामुळे कठोर उपाय होत आहेत.
इतर देशांना सुरक्षा
ज्या देशांमध्ये मिंक (एक सशासारखा प्राणी) उत्पादन केंद्रे अधिक प्रमाणात आहेत, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशी उत्पादन केंद्रे असणाऱया देशांना जागतिक आरोग्य संघटना सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती या संघटनेच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख मारिया व्हॉन केरखॉव्ह यांनी दिली. मिंक या प्राण्यापासून संसर्ग कसा रोखता येईल याचा सल्ला या गरीब राष्ट्रांना आरोग्य संघटनेकडून मिळणार आहे.









