क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य मास्टर्स गेम्स संघटना आयोजित उडुपी येथे झालेल्या तिसऱया राज्यस्तरीय ऍथलेटीक्स स्पर्धेत बेळगावच्या एमएलआयआरसीचा क्रीडापटू योगेश भाऊराव पाटीलने अडथळा शर्यतीत सुवर्ण तर रिले स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले.
उडुपी येथे झालेल्या या स्पर्धेत 110 मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यत योगेशने 15.1 सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला तर 4ƒ100 मिटर रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. योगेशने यापूर्वीही मास्टर्स स्पर्धेत विविध राज्यस्तरीय स्पर्धांमधून पदके मिळवून यश संपादन केले होते. त्याला ऍथलेटीक्स कोच प्रदीप जुवेकर व एमएलआयआरसी प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.









