वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना व्हायरसमुळे जवळपास संपूर्ण जगाला लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. सर्व खेळाडू आपल्या घरी कुटुंबियासोबत वेळ घालवत असल्याचे पहायला मिळत आहे. या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत सामन्य नागरिक सोडाच, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील घरीच केस कापण्याची वेळ आली आहे. सचिनने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सचिन एका हातात कात्री घेऊन केस कापताना दिसत आहे. सचिनने स्वतःच्या केसांना एक नवीन रूप दिले आहे.
सचिनने स्वतःचे केस कापले आणि फोटो
शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, स्क्वेअर कटमध्ये खेळण्यापासून
ते स्वतःचे केस कापण्यापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आनंद घेतला.
हा क्षण मी तुमच्याशी शेअर करत
आहे.
तेंडुलकरने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी या नवीन हेअरकटचे कौतुक केले आहे. सचिनच्या या नव्या हेअर लुकची चर्चा सुरु आहे.