नवी दिल्ली
व्यवसायात महिलांनाही पुढे जाता यावं यासाठी मास्टरकार्डने एक योजना आणली आहे. महिलांनाही यात समान संधी उपलब्ध करून देण्याचा विचार मास्टरकार्डने केला आहे. आर्थिक आणि डिजिटल सेवांची ओळख महिलांना व्हावी यासाठी मास्टरकार्डकडून प्रयत्न सुरू आहेत. छोटय़ा व्यापाऱयांचे जाळे तयार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. युनायटेड स्टेटस् एजन्सीसोबत मास्टरकार्डने विमेन्स ग्लोबल डेव्हलपमेंट अँड प्रॉस्पॅरिटी इनिशीएटीव्हअंतर्गत ‘प्रोजेक्ट किराणा’ ची सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशात सध्या ही योजना राबवली जात आहे.









